The Platform, 2019
कल्पना करा भविष्यातील एक हायटेक तुरुंगाची. जो आहे 200-300 मजली एक अतिउंच टॉवर. सर्वात वरच्या 0 नंबरच्या मजल्यापासून खाली 1,2,3,……..असा खालच्या मजल्यांचा नंबर वाढत जातो. प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी 2 कैदी. त्या टॉवरमध्ये नक्की किती मजले असतील याची कुठल्याच कैद्याला कल्पना नाही. प्रत्येक महिन्याला कुठलातरी गुंगी आणणारा गॅस सोडून कैद्यांच्या नकळत त्यांच्या रूम शफल होत असतात. कुणालाच काही कल्पना नसते की पुढच्या महिन्यात ते नक्की कुठल्या मजल्यावर असतील.
सर्वात वरच्या 0 नंबरच्या मजल्याच्या मध्यभागी असणारा चौकोनी खड्डा अगदी खोलवर खाली ग्राऊंडपर्यंत. त्या चौकोनी खड्ड्यातून वर खाली जाणारा एक चौकोनी प्लॅटफॉर्म आहे. ज्या प्लॅटफॉर्म मार्फत सर्व कैद्यांना दिवसाला एक वेळ जेवण पुरवले जाते. सर्वात वरच्या 0 नंबरच्या मजल्यावर तुरुंग प्रशासन प्लॅटफॉर्मवर कैद्यांसाठी प्रत्येकाच्या आवडीचे, चमचमीत पदार्थ ठेवत असतात. वरून खाली प्रत्येक मजल्यावर जेवणासाठी काही ठराविक काळ थांबत तो खाली खाली जात असतो.
प्लॅटफॉर्म वरतून खाली जात असताना अन्न किती आणि कशा स्वरूपात खालच्या मजल्यावरील कैद्यांपर्यंत पोहचेल हे सर्वस्वी वरच्या मजल्यावरील कैद्यांच्या विवेकावर आणि दयाबुद्धीवर अवलंबुन आहे. त्यामुळे महिन्यानंतर होणाऱ्या रूम शफलवेळी जास्तीत जास्त वरचा मजला मिळावा अशी प्रत्येक कैद्याची इच्छा असते. या अन्न ‘झिरपण्याच्या सिद्धांतां’वर उभे राहते प्लॅटफॉर्म चित्रपटाचे कथानक. कैद्यांचा अन्नासाठी आणि जगण्यासाठी चाललेला संघर्ष म्हणजे हा चित्रपट. आपल्या समाजव्यवस्थेशी आणि आपल्या जगण्याशी याचा कुठेतरी जवळचा संबंध चित्रपट पाहताना प्रत्येक क्षणी जाणवत राहते.
सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रत्येक क्षणी आपल्याला खिळवून ठेवणारा आणि उत्कंठा वाढवत नेणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.
- Galder Gaztelu-Urrutia,
- David Desola, Pedro Rivero
- Cast – Ivan Massagué, Zorion Eguileor, Antonia San Juan, Emilio Buale, Alexandra Masangkay
- IMDb RATING – 7.0/10