एरिन ब्रोकोविच (Erin Brockovich), 2000

(स्टीवन सोडरबर्ग Steven Soderbergh दिग्दर्शित 2000 साली प्रदर्शित सत्य घटनेवर आधारित सिनेमा) 

 

तोकडे कपडे घालणारी, फटकळ, शिवराळ भाषा वापरणारी, ओरडून बोलणारी महिला पाहिली, की तुमच्या मनात काय विचार येतात?

आपल्या मनात येणाऱ्या सर्व पूर्वग्रहांना एरिन ब्रोकोविच सुरुंग लावते. दोन नवऱ्यांपासून झालेल्या 3 मुलांना सांभाळणारी ती एकल माता आहे. एकेकाळी सौंदर्य स्पर्धेत ‘मिस पॅसिफिक कोस्ट'(1981) ती जिंकली होती. मुलं झाल्यानंतर सोडून गेलेले नवरे, ना कुठला जॉब, ना काही आर्थिक आधार, अशा परिस्थितीत त्रासलेली एरिन मुश्किलीने एका लीगल फर्ममध्ये जॉब मिळवते.

तिच्या राहणीमानाकडे, बोलण्याच्या पद्धतीकडे पाहून कामावर देखील तिच्याकडे सगळे एका पूर्वग्रहातूनच पाहत असतात. पण तिच्या कामातून, कामाप्रतीच्या निष्ठेतून ती त्या ठिकाणी स्वतःची एक ओळख निर्माण करते. एका बड्या कॉर्पोरेट कंपनीच्या क्रोमियम प्रदूषणाने प्रभावित झालेल्या स्थानिक लोकांची केस जेव्हा एरिनच्या हाती येते, तेव्हा तिच्यातली संवेदनशीलता, न्यायप्रियता, लढाऊपणा सर्वांच्या लक्षात येतो. 

‘कुठल्याही व्यक्तीकडे पाहताना पूर्वग्रहाचे चष्मे लावून जजमेंटल होणं टाळा’, हा संदेश एरिन तिच्या व्यक्तिमत्वातून खूप प्रभावीपणे देते.

*******

इंग्रजी अनुवाद 

Erin Brockovich

(Based on true story, directed by Steven Soderbergh and released in 2000)

What do you think of a woman who wears tights and shorts, swears and shouts while speaking? 

Erin Brockovich undermines all the prejudices that come to our mind. She is a single mother of 3 children from two ex husbands.  Husbands who leave her after having children. She once won the Miss Pacific Coast (1981) beauty pageant.  After having children, no husband, no job, no financial support. Erin struggles in such a situation, hardly getting a job in a legal firm.

Looking at her way of life, her manner of speaking, even at work, everyone looks at her with wrong prejudices.   But through her work, her devotion, she creates an identity of her own in that place.  When the case of the locals affected by the chromium pollution of a big corporate company falls into the hands of Erin, Her devotion makes it possible to win that legal case. In that case her sensitivity, fairness and fighting spirit are noticed and praised by all.

‘Avoid being judgmental by wearing biased glasses when looking at any person’, this is the message which Erin conveys very effectively through her personality.

(Julia roberts Erin brockovich) erin brockovich 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *