Madhya Pradesh Rape Case: 11 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर हिंसाचार

Madhya Pradesh Rape Caseमध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Rape Case) सतना जिल्ह्यातील मैहर जवळील एका गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

रक्तबंबाळ अवस्थेत मुलगी पोहचली घरी

27 जुलैच्या दुपारपासून गायब असणारी मुलगी 28 जुलैच्या सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचली. आरोपींनी बलात्कारानंतर तिच्या गुप्तांगात काठीसदृश्य कठीण वस्तू घातल्याचे समोर आले आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर चावल्याच्या खुणा आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचलेल्या मुलीची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, तिला मैहर सिव्हिल हॉस्पिटलमधून रीवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले आहे.

मंदिर क्षेत्रात काम करणारे 2 कर्मचारी अटकेत

28 जुलैच्या सकाळी घरी पोहचल्यानंतर पीडित मुलीने नातेवाईकांना झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी स्थानिक लोकांच्या समवेत पोलीस स्टेशन गाठून सदर गुन्ह्याची FIR नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे रवींद्र कुमार आणि अतुल बढोलिया असे असून ते मैहर परीसरातील एका प्रसिद्ध मंदिरात काम करणारे कर्मचारी आहेत.

मंदिर प्रबंध समितीने आरोपींना कामावरून केले कमी

रवींद्र कुमार मंदिर समितीमध्ये तर अतुल बढोलिया हा मां शारदा वन विभाग गोशाळा इथे काम करत होता. सदर घटना उघडकीस आल्यानंतर मंदिर प्रशासनाने त्या दोघांना तात्काळ कामावरून काढून टाकले आहे. या दोन कर्मचाऱ्यांमुळे मंदिराची प्रतिमा मलीन झाली असल्याचे मंदिर प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केले दुःख व्यक्त

मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ट्विट करून सदरील घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे. सदर ट्विटमध्ये ते म्हणतात,

“मैहरमध्ये मुलीसोबत झालेल्या दुष्कर्माची माहिती मिळाली. माझं मन दुःखाने भरले आहे. मी व्यथित आहे. मी पोलिसांना आदेश दिले आहेत, की कुणीही अपराधी वाचला नाही पाहिजे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मुलीवर केल्या जाणाऱ्या सर्व उपचारांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कुणीही अपराधी वाचणार नाही, कठोर कारवाई केली जाईल.”

मध्य प्रदेशात गेल्या काही अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ

एकूण देशभरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील अशा गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. या जुलै महिन्यात अगदी गेल्या काही दिवसातच अशाच गुन्ह्यांची आणखी काही प्रकरणे समोर आली होती. त्यामध्ये मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यात बीजेपी आमदाराच्या मुलाने त्याच्या काही मित्रांसमवेत 2 अल्पवयीन बहिणींवर अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्या दोन बहिणींपैकी एकिवर सामूहिक बलात्कार झाला असल्याचे तर दुसरीबरोबर छेडछाड केल्याचे उघड झाले होते. (Madhya Pradesh Rape Case)

दुसऱ्या एका घटनेत इंदौरमध्ये एका आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले होते. 13 वर्षीय एका आदिवासी मुलीवर 3 आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीच्या अवैध घरावर बुलडोझर चालवून घर जमीनदोस्त केले होते.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी परवा झालेल्या घटनेची निंदा करत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात,

“मैहरमध्ये छोट्या मुलीसोबत झालेले दुष्कर्म अत्यंत निंदनीय आहे. मुलीबरोबर निर्भया कांड प्रमाणे अमानवीय व्यवहार झाला असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही काळात प्रदेशात मुलींसोबत घडणाऱ्या घटनांमधून हे सिद्ध होत आहे, की शिवराज सरकार लेकी-बाळींना सुरक्षा देण्यात पूर्णतः अयशस्वी ठरले आहे.”

(Madhya Pradesh Rape Case)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *