कैरो 678 (Cairo 678), 2010
(मोहम्मद दियाब दिग्दर्शित 2010 मध्ये प्रदर्शित एक इजिप्तशियन सिनेमा) ही गोष्ट आहे इजिप्तमधील तीन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील फायजा, सेबा आणि नेल्ली या तीन महिलांची. पण ही गोष्ट फक्त ह्या तिघींची नाही, ती जगभरातल्या सगळ्याच स्त्रियांची आहे. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांवर...